ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

राशन बाबत जातीयवाद वाढवणारा जी आर मागे घ्यावा . अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु .

उल्हासनगर / प्रतिनिधी : रेशनिंगसाठी अनुसूचित जाती व जमाती यांचे सर्वेक्षण करण्याचा केंद्र सरकारने जी आर काढला आहे, त्यामुळे दुकानदार राशन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना जात सांगा मगच राशन देतो असे बोलु लागल्याने राशन कार्ड धारकात असंतोष निर्माण झाला आहे . दरम्यान या जी आर बाबत माहिती मिळताच मुंबई रेशनिंग कृती समितीने सदर जी आर मागे घेण्याची मागणी केली आहे .दरम्यान या जी आर ला विरोध करत मुंबई रेशनिंग कृती समिती उल्हासनगर शहर शाखेच्या पुढाकाराने उल्हासनगर मधील विविध सामजिक संस्था यांना सोबत घेऊन उल्हासनगर तहसीलदार कार्यालय आणि शिधावाटप कार्यालय (४० / फ) येथे निवेदन देण्यात आले आहे .

यावेळी मुंबई रेशनिंग कृती समितीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष आतिश रमेश जाधव यानी या जी आर बाबत माहिती देताना सांगितले की केंद्र सरकार ने काढलेला जी आर हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या पूर्णतः विरोधात आहे . कारण राशन हे सर्व सामन्याचा हक्क आहे, त्यात जात याला काडीचे ही महत्व नाही . राशन हे आर्थिक निकषांवरच दिले जाते, तसेच राशन कार्ड प्रक्रियेत जात नावाचा कॉलमच नाही, परंतु केंद्र सरकारने जी आर काढून फक्त अनुसूचित जाती जमाती यांचे सर्वेक्षण करायला घेतले आहे . ज्यामुळे जातीयता वाढण्याची शक्यता आहे, कारण अनेकांच्या मनात समज-गैरसमज निर्माण होत आहेत की फक्त याच वर्गाचे सर्वेक्षण का सुरू आहे. दरम्यान राशन फक्त याच प्रवर्गाला आहे की सर्वाना आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत .
जर या प्रवर्गासाठी सरकारला खरंच काही करायचं असेल तर जात निहाय जनगणनेनुसार या प्रवर्गाच सर्वेक्षण करावं आणि या प्रवर्गाच्या विकासासाठी योजना आखाव्यात पण रेशनिंग प्रक्रियेत जात आणू नये. आणि हा जातीयता वाढवणारा जी आर शासनाने तात्काळ मागे घ्यावा.अन्यथा मुंबई रेशनिंग कृती समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा दिला असुन वेळ प्रसंगी या जी आर विरुध्द न्यायालयात दाद मांगण्यात येणार आहे .तहसिलदार याना निवेदन देताना मुंबई रेशनिंग कृती समितीचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. विकास जाधव , उल्हासनगर पूर्वच्या अध्यक्षा निवेदिता जाधव, उल्हासनगर शहर सचिव सुनील इंगळे, उल्हासनगर वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई उबाळे, वंचित बहुजन आघाडी आशेळा पाडा, बहुजन मुक्ती पार्टी, निवारा बहुउद्देशीय संस्था, मानवता अभियान, शांतीदूत बुद्ध विहार सेवासंघ, श्रमिक महिला मंडळ, जन विकास सामजिक संस्था, सिद्धार्थ मित्र मंडळ, आदर्श फाउंडेशन, समाज परिवर्तन युवा मित्रमंडळ, प्रबोधन शिक्षण संस्था, उडाण सामजिक संस्था, अस्तित्व फाउंडेशन, सुभाष टेकडी युवा मित्रमंडळ व आधार फाउंडेशन या सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी
उपस्थित होते.

error: Content is protected !!