ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

भ्रष्टाचाराला रान मोकळे करून देणारा ४५९४९ कोटींचा पालिकेचा मोठा अर्थसंकल्प


मुंबई/ ५०० चौरस फूट पर्यंतच्या घराणं मालमत्ता कर माफ करणाऱ्या मुंबई महानगर पालिकेने यंदा ४५९४९ कोटींचा मोठा अर्थसंकल्प सादर करून पालिकेच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी टपून बसलेल्यांना मोठे चराऊ कुरान उपलब्ध करून दिले आहेत अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद आहे आणि हीच मोठी तरतूद कंत्राटदार आणि त्यांचे मायबाप असलेल्या पालिका प्रशासनाची कमाई आहे असा आरोप मुंबईकरांनी केला आहे
मागील वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प होता त्यात तब्बल १७.७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे अर्थात ही वाढ मुंबईकरांच्या हिताची असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात यात कंत्राटदारांचे हित असेल हे वेगळे सांगायची गरज नाही या अर्थसंकल्पात कोस्टल रोड साठी ३२०० कोटी,वाहनतळ प्राधिकरण साठी २२००कोटी,गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १३०० कोटी,पुलांच्या दुरुस्ती आणि निर्मितीसाठी १५७६ कोटी,बेस्ट साठी ८०० कोटी, watsapp chat बोटं साठी ७८ कोटी अशी भरीव तरतूद आहे शिक्षण समितीचाही ३३७०.२४ कोटींचा अर्थसंकल्प आहे ज्यात शैक्षणिक भांडवलासाठी ५०० कोटी,शाळांच्या देखभाल आणि स्वच्छतेसाठी ७५ कोटी,क्रीडा संकुलासाठी ५० कोटी,विद्यार्थ्यांसाठी टॅब आणि इतर शक्षनिक वस्तुंसाठी भरीव तरतूद आहे.मुंबईतील महापालिकेच्या ८० टक्के शाळा पट संख्या अभावी बंद पडल्याचे सांगितले जाते मग मग या नसलेल्या शाळांसाठी अर्थसंकल्पात एवढी मोठी तरतूद का आणि कुणाच्या फायद्याची असा संतप्त सवाल मुंबईकरांनी केला आहे
मुंबईत आजही रस्ते,पाणी,गटारे,परिवहन सार्वजनिक आरोग्य सेवा या मूलभूत सेवा सुविधांमध्ये मोठ्या सुधारणांची आवश्यकता आहे पण त्यासाठी काहीच करण्यात आले नाही एक कोस्टल रोड्साठी तरतूद केलेला निधी पूर्ण वापरण्यात आला बाकीच्या विकास कामांचा निधी पडून आहे शेवटी तो काही नगरसेवकांनी आपल्या वार्ड साठी वाटून घेतल्याची चर्चा आहे पालिकेच्या याच आर्थिक गैरव्यवहार वर कॅग्ने गंभीर ताशेरे ओढले आहेत असे असताना या निवडणूक वर्षात अर्थसंकल्पात वाढ का याचे उत्तर मुंबईकरांना मिळाले आहे

error: Content is protected !!