ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मराठा आरक्षणाचा वानवा साताऱ्यात पोहचला – नेत्यांना गावबंदी पाठोपाठ मतदानावरही बहिष्कार


वाई (जि. सातारा) : मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदीचा वणवा सातारा जिल्ह्यातही पोहोचला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर गावागावात नेत्यांना गाव बंदी केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील शेलारवाडीत नेत्यांना नुसती बंदी घातली नाही, तर येणाऱ्या सर्वच मतदानावर बहिष्कार टाकल्याने धाबे दणाणले आहेत.
आरक्षणासाठी राज्यभरात पुढाऱ्यांना गावबंदी, काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. आत्महत्येसारखा दुर्दैवी प्रकारही घडत आहे. त्यामुळे दिवसागणिक परिस्थिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये येण्यास बंदी करण्यात आली आहे. अजित पवारांनी बारामतीत येऊ नये, आलात तर आंदोलन करु, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाला येवू नये, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आली होती. यावर तोडगा काढण्यासाठी कारखाना प्रशासन पोलीस प्रशासन आणि सकल मराठा समाजाची संयुक्त बैठक कारखान्याच्या शिवतीर्थ कार्यालयात झाली. ती बैठक निष्फळ ठरली.
मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटातही पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील पदाधिकाऱ्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण आंदोलकांना पोलिसांकडून देण्यात येत असलेल्या नोटिसांवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाकडून पाठिंबा दिला जात आहे. कल्याणमध्ये देखील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज कल्याण तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या साखळी उपोषणात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे हे देखील सहभागी झाले. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणार आहे अशी घोषणा अरविंद मोरे यांनी केली.

error: Content is protected !!