मोटरमन च्या आंदोलनामुळे लोकल वाहतूक विस्कळीत
मुंबई -मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी शुक्रवारी (दि.10) प्रगती एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, कुटुंबातील सदस्यांना येण्यास विलंब झाल्याने मोटरमनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सायंकाळ झाली. त्यात मोटरमनने आत्महत्या केल्याने इतर कर्मचारी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले. त्यामुळे कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली. याचा परिणा…
