पाच राज्यांच्या निवडणुकीची भाजपकडून तयारी सुरू
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांची तयारी भाजपने सुरू केली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहतील. अद्याप विधानसभा निवडणुकीचा घोषणा झालेली नाही. आतापर्यंत निवडणुका जाहीर झाल्यानंतर बैठका होत होत्या….
