आमदार अपात्रता प्रकरण तारीख पे तारीख सुरूच -पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला होणार
नवी दिल्ली- शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. येत्या ३० ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे. 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडण्याची शेवटची संधी असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे,…
