ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

सिंधुदुर्ग जिल्हा बँक राणेंच्या ताब्यात महा विकास आघाडीचा पराभव=सर्वांना पुरून उरलो- नारायण राणे

कणकवली/ शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकलापर्यंत कोकणात शिवसेना आणि राणे समर्थक यांच्यात धुमशान सुरू आहे गुरुवारी नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला तेंव्हा महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून धुमशान केले तर काल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फद्क्वणे नारायण राणे च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून धुमशान केले
गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली होती काल या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि भाजपा प्रणित सिद्धिविनायक सहकार पेनालचा विजय झाला १९ पैकी ११जागा राणेंच्या पॅनलने जिंकल्या तर महा विकास आघाडीला फक्त ८ जागा मिळाल्या राणेंच्या सिद्धिविनायक सहकार पनलेचे विठ्ठल देसाई,महेश सारंग,मनीष दळवी,दिलीप रावराणे,अतुल काळसेकर,बाब परब,प्रकाश बोडस आदी ११जन विजयी झाले या विजयानंतर राणे समर्थकानी फटाके फोडून जल्लोष केला तर शिवसेनेच्या गोटात सन्नाटा होता.
ही निवडणूक भलेही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची असली तरी राणे विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्षामुळे निवडणुकीला विधानसभा निवडणुकीचे सरूप आले होते या बँकेच्या निवडणूक प्ररचारासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार,उदय सामंत सतेज पाटील आदी मंत्री सुधा आले होते पण काहीच फायदा झाला नाही. दरम्यान या निवडणुकी पूर्वी संतोष परब वरील हल्ल्यामुळे कोकणातील वातावरण तणावपूर्ण बनले होते आणि याच वातावरणात झालेल्या निवडणुकीत अखेर राणेंनी बाजी मारली त्यामुळे महा विकास आघाडीला आणि खास करून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे
सर्वांना पुरून उरलो/ नारायण राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझ्या विरोधात भले भले असेल पण सर्वांना मी पुरून उरलो आणि जिल्ह्याच्या राजकारणापासून दिल्लीतील मंत्रिपद पर्यंत पोहचोल आता पुढील लक्ष विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आहे. विरोधकांना म्हणावे एक हातात पोस्टर आणि दुसऱ्या हातात गम घेऊन पोस्टर लावीत फिरा तुमची पात्रता नाही अशी प्रतिक्रिया राणेंनी व्यक्त केली आहे

error: Content is protected !!