ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शरद पवार गटाच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर


मुंबई/लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जोर बैठकांमधून काहीही निष्पन्न होत नसले तरी आघाडीतील घटक पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे सर्वात प्रथम ठाकरे गटाने 17 उमेदवार जाहीर केले त्यानंतर काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आणि आता शरद पवार गटाने पाच नावे जाहीर केली आहे यामध्ये बारामती मधून सुप्रिया सुळे शिरूर मधून अमोल कोल्हे अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके वर्धा मधून अमर काळे नाशिक मधून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे शरद पवार गटाच्या उर्वरित उमेदवारांची यादी नंतर जाहीर केली जाईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले या यादीमध्ये सर्वात चुरशीची निवड होणार आहे ती अर्थातच बारामती मधून सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे कारण ही निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असे असली तरी प्रत्यक्षात मात्र ही निवडणूक पवार काका पुतण्यांच्या अस्तित्वाची लढत आहे

error: Content is protected !!