ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलकाची निवडणुकीतून माघार

मुंबई/मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे तसेच आरक्षणाचा लढा नेटाने लढणारे मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे .आमचा कुठलाही उमेदवार या निवडणुकीत नसेल. पण त्याचबरोबर मराठा समाजाने त्यांना जो योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावे. ज्यांना पाडायचा असेल त्यांना पाडावे असे त्यांनी मराठा समाजाला सांगितलेले आहे. मराठा आंदोलन करते लोकसभा निवडणुकीत उतरणार अशी सुरुवातीला चर्चा होती. परंतु निवडणुकीच्या नावाखाली काही गावांमधून वर्गणी गोळा करायला सुरुवात झाली. तसेच उमेदवारांमध्येही प्रचंड मतभेद निर्माण झाले. एका बैठकीत तर हाणामारी झाली होती म्हणूनच जणांचे पाटलांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे पण त्याचबरोबर ज्यांनी मराठा आंदोलकांच्या विरोधात काम केले. मराठा आंदोलनाला अपशकून केला. अशा लोकांना या निवडणुकीत पाडा. असा आदेश त्यांनी मराठा समाजाला दिलेल्या आहे .जरांगे पाटील निवडणुकीतून बाजूला झाल्यामुळे काँग्रेस भाजपा आणि सगळ्याच पक्षांनी सुटकेचा विश्वास टाकलेला आहे. कारण जरांगे पाटलांचे उमेदवार जर लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहिले असते, तर मराठ्यांची सगळी मते त्यांना गेली असती. आणि त्याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही बसला असता.

error: Content is protected !!