ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महायुती चार जागांवरून तिढा कायम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पहाटे तीन वाजेपर्यंत बैठक


मुंबई/महाविकास आघाडी प्रमाणेच सत्ताधारी महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपाचा पेच आता कळीचा मुद्दा बनलेला आहे. महायुतीमध्ये नाशिक, धाराशिव ,छत्रपती संभाजी नगर, आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जाग्यांवरून तिढा निर्माण झालेला आहे. तो सोडवण्यासाठी पहाटे तीन वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली परंतु त्यातून ही काही मार्ग निघालेल्या नाही. त्यामुळे या चार जागा कोणाकोणाला मिळणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे.
नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम आहे. आणि इथले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आत्तापर्यंत चार वेळा मुख्यमंत्री ची भेट घेतलेली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित दादा ग ट यांचाही या जागेवर दावा असून छगन भुजबळांसाठी ही जागा सोडावी असा आग्रह धरला जात आहे. तर भाजपाने ही या जागेवर दावा केला आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार आमचे नाशिक मध्ये तीन आमदार आणि ७० नगरसेवक आहेत. त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळायला हवी. असं भाजपचं म्हणणं आहे. या सर्व वादावर तोडगा काढण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या जागेसाठी इच्छुक असलेल्या पक्षाच्या नेत्यांमध्ये पहाटे तीन वाजेपर्यंत देवगिरी बंगल्यावर मीटिंग झाली. परंतु या मीटिंगमध्ये काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे निवडणुकीचा अर्ज भरण्याची वेळ जसजशी जवळ येत चालली आहे तसतसा या जागेवर इच्छुक असलेल्या उमेदवारांचा जीव खालीवर होत आहे. त्यामुळे आता या चार जागा कोणाला मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघावर उदय सामान यांचे बंधू किरण सामान यांचा दावा आहे. तर नारायण राणे ही जागा भाजपलाच मिळायला हवी असे म्हणतात. त्यामुळे तिथे तिढा निर्माण झालेले आहे. धाराशिव मध्ये ही भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद निर्माण झाला आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर मध्ये शिवसेनेकडून संदिपान भुमरे तर भाजपकडून भागवत कराड यांचे दावे प्रलंबित आहेत .हे सर्व पाहता आता या चार जागांवर काय होईल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

error: Content is protected !!