ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

मुंबईस्थीत एसव्हीपी ग्लोबलची ओमानमधील प्रकल्पात 150 दशलक्ष यु एस डॉलरची गुंतवणूक

मुंबई, ता. 18 (प्रतिनिधी): भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना, देशातील सर्वात मोठी व मुंबईस्थीत कॉम्पॅक्ट कॉटन यार्न उत्पादक एसव्हीपी ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेडने ओमानमधील त्याच्या मोठ्या कापड निर्मिती प्रकल्पात प्रत्यक्ष व्यावसायिक कामकाज सुरू करण्याची घोषणा केली आहे. या समूहाने ओमानच्या ‘सोहर फ्री ट्रेड झोन’ येथील प्रकल्पात १.५. लाख स्पिंडल आणि ३,५०० रोटर्स सुविधा उभारण्यासाठी १५० दशलक्ष (अंदाजे १,१०० कोटी रुपये) गुंतवले आहेत. सप्टेंबर २०२१ पर्यंत हा प्लॅंट त्याच्या सर्वोच्च स्थानी पोहोचेल आणि कंपनीच्या उत्पन्नात भरीव योगदान देईल अशी अपेक्षा आहे असे मत एसव्हीपी ग्रुपचे संचालक चिराग पिट्टी यांनी व्यक्त केले.

श्री.वल्लभ पिट्टी यांनी १८९८ मध्ये स्थापन केलेली एसव्हीपी ग्रुप प्रामुख्याने पॉलिस्टर, पॉलिस्टर आणि कॉटन ब्लेंड आणि १०० टक्के सुती कापड (कॉटन यार्न), झालावार (राजस्थान), रामनाड (कोयंबटूर) आणि सोहर (ओमान) च्या निर्मितीमध्ये गुंतलेले आहे.. यार्न, फॅब्रिक आणि गारमेंट्स (थ्रेड, टेक्सटाइल आणि अॅपरल) च्या उत्पादनात कंपनीने जागतिक स्तरावर अग्रणी कंपनी बनण्याचे स्वप्न ठेवले आहे.

error: Content is protected !!