ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

कोल्हापूर दौर्‍यात सोशल डिसटिंगचा फज्जा


आजी माजी मुख्यमंत्री आमने सामने
कोल्हापूर/ कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना सोशल डिस्टिंग बाबत उपदेश करणारे नेते स्वतः मात्र या नियमाचे पालन करीत नाहीत काल कोल्हापूर मध्ये हेच बघायला मिळाले कोल्हापूरच्या पाहणी दौर्‍यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत मोठा फौज फाटा होता. मात्र त्याच वेळी देवेंद्र फडणवीस हे सुधा कोल्हापूरच्या पाहणी दौर्र्‍यावर होते .या दोन्ही आजी माझी मुख्यमंत्र्यांची कोल्हापुरातील शाहूपुरी येथे कुंभार गल्लीत भेट झाली यावेळी तेथे शिवसेना भाजप या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ,प्रशासनाचे अधिकारी आदी मिळून दोन तीन हजार लोक उपस्थित होते. तिथे प्रचंड गर्दी झाल्याने सोशल डिस्टन चा फज्जा उडाला होता पण दुसऱ्यांना सोशल डिस्टनचे महत्व पटवून देणाऱ्या या आजी माझी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या भोवती जमलेल्या गर्दीची अजिबात चिंता नव्हती .लोकल मधल्या गर्दीमुळे कोरोंनाचा पसरले असे उद्धव ठाकरे यांना वाटते मग तुमच्या दौरयातील गर्दीने कोरोंना पसरणार नाही का ? असा सवाल लोक विचारीत आहेत
.

error: Content is protected !!