ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबईतील बडेमियाला दणका – ७५ वर्षांच्या इज्जतीचा फालुदा

मुंबई– जो बडे होते हैं उनके झोल भी उत्ने बडे होते हैं!फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथो रेटी इंडियाचा परवाना नसतानाही येवढे मोठे हॉटेल चालवणाऱ्या दक्षिण मुंबईतील बडेमिया या हॉटेलवर अंनन व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून हे हॉटेल सिल केले बडेमियला हा मोठा दणका आहे
यासंदर्भात माहिती देताना अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, आवश्यक ते परवाने मिळवेपर्यंत बडेमियाँ हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. यानंतर पुन्हा एकदा हॉटेलची तपासणी केली जाईल. या कारवाईनंतर बडेमियाँ कबाब स्पेशल हॉटेलच्या दक्षिण मुंबई आणि वांद्रे येथील शाखांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. ७६ वर्षे जुने असलेल्या बडेमियाँ या रेस्टॉरंटकडे फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाचा परवाना नसल्याचेही समोर आले.

हाॅटेल मालकाने या संदर्भात म्हटले की, आमच्याकडे फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाचे लायसन्स वगळता सर्व परवाने आहेत. आम्ही अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या सूचनांचे पूर्ण पालन करण्यास तयार आहोत. याशिवाय अन्न व औषध प्रशासनाने गोवंडी येथील क्लाऊड किचन स्वरूपातील हायपरकिचन, माहीम येथील मुंबई दरबार आणि वांद्रे येथील पापा पेंचो दा ढाबा या हाॅटेलवर ही कारवाई करण्यात आली आहे.

error: Content is protected !!