ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबईराजकीय

लोअर परेल ब्रिज लवकर पूर्ण करा अन्यथा उग्र आन्दोलनाचा -मनसेचा इशारा

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना अत्यंत महत्वाचा असलेला लोअर परेल ब्रिज मनसेने घेतलेल्या सह्यांच्ग्या मोहिमे मुळे पुन्हा प्रकाश झोतात आला आहे.वरळी परिसराला जोड़णारा आणि दादर,प्रभादेवी, एल्फिंस्टन,नाम जोशी मार्ग या विभागातील लोकांना रहदारीचा मुख्य मार्ग असलेला लोअर परेल ब्रिजचे काम चार वर्ष होत आली तरीही पूर्ण झाले नसल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या रणरागिणीनी सह्यांची मोहिम राबवित झोपलेल्या राज्य सरकार,महानगर पालिका आणि रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे.आम्ही हि दूसऱ्यांदा सह्यांची मोहिम राबवित संबंधित प्रशासनाला जागे करण्यासाठी हा अखेरचा इशारा देत असल्याचे विभाग अध्यक्ष संजय जामदार यांनी संतप्त पणे म्हटले आहे.जर लवकरात लवकर पूल पूर्ण झाला नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू असा गंभीर इशाराही त्यांनी दिला. दिनांक.17 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 8 वाजल्या पासून सह्यांची मोहिम राबविली जात आहे याला नागरिकांच्या सहभागामुळे मोठे महत्व प्राप्त झाल्याचे दिसत होते.स्थानिक शाखा अध्यक्ष मारुती दळवी,गौरव सकपाळ यांनी स्वाक्षरी मोहिमेत विशेष भूमिका पार पाडली.या स्वाक्षरी मोहिमेत मागील आणि आताच्या स्वाक्षरी मिळून जवळपास 40 हजारावर लोकांनी सहभाग घेत संताप व्यक्त केला आहे.

मनसेचे उपाध्यक्ष बंटी म्हशीलकर,शिवड़ी विभाग अध्यक्ष नंदकुमार चिले आणि महिला पदाधिकारी यांनीही मोहिमेत सहभागी होत पुल लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी केली. 

या संदर्भात मनसेचे विभाग अध्यक्ष संजय जामदार सांगतात की, लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील पूल धोकादायक स्थितीत आल्याने ते पाडून त्याठिकाणी नवीन पूलाचे बांधकाम महापालिका आणि रेल्वेच्या संयुक्त माध्यमातून हाती घेण्यात आले.परंतु रेल्वेच्या हद्दीतील काम नोव्हेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु नोव्हेंबर 2021 काम पर्यंतही पूर्ण होऊ शकलेले नाही.या पुलाच्या बांधकामावर सुमारे 138 कोटी रुपये खर्च होतोय.पुलाच्या बांधणीसाठी जीएचव्ही इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी निवड करण्यात आली आहे.रेल्वे हद्दीतील पुलाच्या बांधकामासाठी जानेवारी 2020 मध्ये सुरुवात झाली. रेल्वे हद्दीतील पुलाच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने 125 कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यानुसार महापालिकेने रेल्वे प्रशासनाला 25 कोटी 16 लाख रुपये अधिदान दिल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि हे काम नोव्हेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु आजपर्यंत रेल्वेच्या हद्दीतील काम पूर्ण झालेले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुलाच्या नवीन बाँधकामाचा श्रीगणेशा झाला होता त्यावेळी सारे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि महापौर किशोरी पेडणेकर, स्थायि समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आमदार सचिन अहिर,आमदार सुनिल शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्गाटन करतात तोच पूल जर वेळेत पूर्ण होत नसेल तर मुंबईतील पालिकेच्या कामा विषयी न बोललेलेच उत्तम अशी कोपरखळी संजय जामदार यांनी सेनेच्या ताब्यातील मुंबई महानगर पालिकेला दिली.

error: Content is protected !!