ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

मुकुल रोहतगी यांचा जबरदस्त युक्तीवाद! आर्यनला जामीन मिळणार

मुंबई/ आर्यन खान याच्या जमीन अर्जावर आज बचाव पक्षाचे वकील आणि जेष्ठ कायदे तज्ञ मुकुल रोहतगी यांनी जबरदस्त युक्तिवाद करताना एन सी बी ने आर्यनवर लावलेली कलमे कशी चुकीची आहेत हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने .आता आर्यन खाणला जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
आज दुपारी न्या.नितीन सांबरे यांच्या समोर आर्यनचां जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली यावेळी आर्यनचे वकील मुकुल रोहितागी यांनी सांगितले की आर्यन कडे ड्रग सापडलेले नाही . त्याने ड्रग घेतलेले नाही तो केवळ त्या पार्टी मध्ये गेस्ट म्हणून जाणार होता . तरीसुद्धा एन सी बी ने त्याला यात अडकवण्याचा आले आर्यन याच्यावर जी कलमे लावली ती अन्यायकारक आहे . शिवाय या प्रकरणातील ड्रग पेदलार सचित याचे आणि आर्यनचे कोणतेही व्हाँटस्रअप वर सापडले नाहीत तसेच जे वॉट्सअप चाट एन सी बी ने सादर केले त्याचा आणि क्रुझ वरील पार्टी च संबंध नाही असे रोहितागगी यांनी सांगितले . त्याच बरोबर ज्या अर्बजचे आर्यन सोबत संबंध दाखवण्यात आले त्या अर्बजकडे फक्त ६ ग्राम ड्रग सापडले मात्र त्याचा आणि आर्यनच काहीच संबंध नाही असेही रोहीतागी यांनी सांगितले .त्यानंतर आता सरकारी वकिलांचा आज अपुरा राहिलेला युक्तिवाद उद्या सुरू होईल मात्र रोहतगी यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यावरून आर्यन खान याला आज जमीन मिळण्याची शक्यता आहे


बॉक्स / कोर्टातील गर्दीमुळे न्यायमूर्ती संतप्त
आज दुपारी न्यायालयीन सुनावणीच्या वेळी न्यायालयात खूप गर्दी झाली त्यामुळे न्यायमूर्ती सांबरे संतापले आणि त्यांनी या केस शी संबंधित असलेल्या लोकांनीच न्यायालयात थांबावे इतरांना बाहेर काढा असे आदेश दिले त्यानंतर इतरांना बाहेर काढण्यात आले आणि आर्यन वरील सुनावणीला सर्वात होण्यापूर्वी मिडीयाला प्रवेश देण्यात आला

error: Content is protected !!