ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिध्देश शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार

शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार१८वी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा : महाराष्ट्र संघ घोषित; आळंदी येथे रंगणार थरार

पुणे : ठाण्याचा सिध्देश शर्मा व प्रणिता सोमण यांच्याकडे १८ व्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी अनुक्रमे पुरूष व महिला गटात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

ही स्पर्धा पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे २९ व ३० आॅक्टोबर दरम्यान होणार आहे. सायकलिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र (सीएएम) सरचिटणीस संजय साठे व सीएएमचे निवड समिती अध्यक्ष प्रताप जाधव यांनी महाराष्ट्र राज्याच्या ३५ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली.

ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी येथे होणारी ही स्पर्धा पुरूष व महिलांसह ज्युनियर, सब ज्युनियर व युथ गटात होणार आहे. कर्नाटक येथिल गडाग येथे गतवर्षी झालेल या अजिंक्यपद स्पर्धेत २१ वर्षीय सिध्देश शर्माने पाचवे स्थान पटकावून मास स्टार्ट प्रकारात प्रॉमिसिंग राईडर होता.

महिला गटाचे नेतृत्व करणारी प्रणिताने काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या साऊथ एशियन अजिंक्यपद स्पर्धेत डाऊन हिल प्रकारात कास्यपदक जिंकले होते. प्रणिताने गडाग येथिल स्पर्धेत वैयक्तिक टाईम ट्रायल, मास स्टार्ट व टिम रिले या प्रकारात सुवर्णपदके जिंकून बेस्ट सायकलिस्ट वुमन चा किताब आपल्या नावावर केला होता. महाराष्ट्र संघाने गत स्पर्धेत उपविजेतेपद जिंकले होते.

सीएएम सरचिटणीस संजय साठे व निवड समिती अध्यक्ष प्रताप जाधव शेवटी म्हणाले, या स्पर्धेसाठी आम्ही महाराष्ट्र दोन्ही उत्कृष्ट संघांची निवड राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई जिल्हा, मुंबई उपनगर, नाशिक, सातारा, क्रीडा प्रबोधिनी, अमरावती, कोल्हापूर, जळगांव या जिल्ह्यातून केली आहे.

विविध गटातील महाराष्ट्र संघ पुढिल प्रमाणे :

  • पुरूष : सिध्देश शर्मा (ठाणे), विठ्ठल भोसले (पुणे), भिम बी. रोयाका (पुणे), कुणाल महावीर (मुंबई जिल्हा), मनोज महाले (नाशिक), कृतार्थ रावले (मुंबई उपनगर), विवेक देशमुख (सातारा), केदार देशमुख (मुंबई उपनगर), गौरव तांबे (मुंबई उपनगर), भूषण चव्हाण (क्रीडा प्रबोधिनी, पुणे);

*ज्युनियर मुले: जतिन जोशी (नाशिक), ओंकार खेडेकर (पुणे), निसर्ग भामरे (नाशिक), सुशिलकुमार जांबेकर (अमरावती), राज बिलावेकर (अमरावती);

*सब ज्युनियर मुले: अदिप वाघ (पुणे), अक्षय जाधव (पुणे), हर्षद पाटिल (कोल्हापूर), आर्यन मराल (पुणे);

*युथ मुले: योगेश सोनावणे (नाशिक), सिध्देश घोरपडे (कोल्हापूर), सोहम पवार (पुणे).

  • महिला: प्रणिता सोमन (अहमदनगर), रूतिका गायकवाड (नाशिक), प्रियांका करांडे (सांगली), श्रिया यादव (औरंगाबाद );

*ज्युनियर मुली: मनाली रतनोजे (पुणे), पूजा अंबे (औरंगाबाद), साक्षी कुंभोजे (कोल्हापूर), राधिका दराडे (पुणे);

*सब ज्युनियर मुली: सिद्धी शिर्के (पुणे), सानिशा धु्रता (पालघर), वैष्णवी पाटील (काल्हापूर);

*युथ मुली: शर्वनी पारीत (पुणे), रूतू भांबरे (नाशिक), अकांशा मिहेत्रे (जळगांव);

*तांत्रिक अधिकारी: बिरू भोजणे (पुणे), प्रविण वाघमारे (पुणे), पांडुरंग भोजणे (पुणे), शितल भाजणे (पुणे), केनिस रेमेलो (मुंबई).

error: Content is protected !!