ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील-उद्धव ठाकरे


मुख्यमंत्र्यांच्या इशारमुळे पूरग्रस्त संतप्त
कोल्हापूर- कोरोंनाची भीती दाखवून लादलेल्या लॉक डाऊन आणि निर्भधामुळे अगोदरच लोकांचे हाल सुरू आहेत त्यात या नैसर्गिक आपत्तीने लोक अर्ध मेले झालेत त्यांना मदतीचा हात देण्या ऐवजी यापुढे कठोर निर्णयांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिला आहे त्यामुळे पूरग्रस्त भागातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे.आणि या संतापाचा कधीही उद्रेक होऊ शकतो.दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली
अतिवृष्टी आणि भुसकलन यात सर्वाधिक नुकसान रायगड,सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे.या तिन्ही जिल्ह्यात झालेल्या दुर्घटना मध्ये २५१ लोकांचा मृत्यू झाला तर हजारो कोटींच्या मालमत्तेची हानी झाली .वशिष्ठ नदीला आलेल्या महापुरामुळे संपूर्ण चिपळूण शहर बुडाले तर पंचगंगेच्या पुरामुळे अर्ध्या कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजला मुंबई बंगलोर मार्ग ५ दिवस पाण्याखाली होता रस्ते, बाजारपेठा ,निवासी भाग,कारखाने सर्व काही पाण्या खाली गेले त्यामुळे लोक अक्षरशः कफल्लक झाले आहेत। काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात भेट दिली आणि तिथल्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी ते कोल्हापूर जिल्ह्यासाठी काहीतरी मोठी घोषणा करतील असे वाटले होते पण तसे काहीच झाले नाही उलट झालेले नुकसान खूपच मोठे असल्याने यापुढे काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे सांगून पूरग्रस्तांच्या मनातली भीती आणि संताप वाढवला आहे त्यामुळे लोक संतापले आहेत.अगोदरच कोरोंनाचे कारण पुढे करून आमचा नोकरी धंदा बंद केलेत त्यामुळे आता आणखी कठोर निर्णय घेऊन आम्हाला मारून टाकणार आहात का असा संतप्त सवाल कोल्हापूरची जनता विचारत आहे तसेच आता दौरे बस झाले मदत द्या आम्हाला या संकटातून उभे करा असा आक्रोश करीत आहे.


आजी माजी मुख्यमंत्री समोरासमोर
काल मुख्यमंत्री कोल्हापूरच्या शाहूपुरी भागातील कुंभार गल्लीत पाहणी करीत असताना त्याच वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तफाही तेथे आला आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांची भेट झाली यावेळी भाजप,शिवसेना या पक्षाचे हजारो कार्यकर्ते तसेच प्रशासनातील अधिकार आणि पोलीस तेथे हजार होते प्रचंड गर्दी झाली होती एरव्ही लोकल ट्रेन मधील गर्दी ची भीती दाखवून लोकल ट्रेन सर्वसामान्य लोकांना बंद ठेवणारे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या दौर्‍यातील गर्दी आणि सोशल डिस्टचां उडालेला फज्जा मात्र दिसला नाही

error: Content is protected !!