ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

ओसाड गावची पाटीलकी

मोदी आणि भाजपचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना केले आहे.तशी पत्र त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना पाठवली आहे. ममता यांचा हा पत्र प्रपच सुरू होऊन काही तास लोटले नाही तोच दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक बैठक होऊन त्यात शरद पवार यांना यूपीए चे अध्यक्ष करावे असा ठराव मंजूर करण्यात आला.पण त्यांच्या या ठरावाला किती विरोधी नेत्यांचा पाठिंबा मिळेल हा संशोधनाचा प्रश्न आहे कारण काही महिन्यांपूर्वी ममता जेंव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आली होत्या तेंव्हा त्यांनी यूपीएचां अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण केले होते .कारण यूपीए ची सध्याची अवस्था पाहता यूपीए चे अध्यक्ष पद म्हणजे एक प्रकारे ओसाड गावची पाटीलकी! पण कधी कधी कसे असते की दगडाला जरी शेंदूर फासला तरी लोक देव म्हणून त्याच्या पाया पडतात.अशा वेळेस यूपीए चे अध्यक्ष पद रामदास आठवलेंना जरी दिले तरी नावापुरते का होईना लोक त्यांच्या भोवती चार दिवस गोळा होतील आणि नंतर आपापल्या वाटेने निघून जातील. यूपीए चे सुधा असेच आहे.कारण आतापर्यंत कितीवेळा यूपीएला हळद लागली आणि कितीवेळा ती पुसली गेली याची मोजदाद नाही.त्यामुळे आता लोकांचा यूपीए आणि त्यांच्या दलबदलू नेत्यांवर अजिबात विश्वास नाही .कारण लोकांना ठाऊक आहे ही सगळी जनता पक्षाची पिलावळ आहे त्यामुळे हे लोक कधीच एकत्र राहू शकत नाही.अशावेळी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी शरद पवारांना आपला नेता बनवला तरी विरोधकांचे हे ऐक्य किती दिवस टिकेल याची गॅरंटी नाही.राहता राहिला सवाल शरद पवारांचा! तर त्यांच्या शिंकेवरही कोणाचा विश्वास नाही.कारण ते नेहमीच बेरजेचे राजकारण करतात.उद्या ते सतेसाठी भाजपा मध्ये गेले तरी कुणालाही आश्चर्य वाटणार नाही त्यामुळे यूपीए आणि त्यांचा शरद पवार यांच्या सारखा नेता हा भारतीय राजकारणात चेष्टेचा विषय आहे.सध्या यूपीए चे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे .काँग्रेसला भलेही दोन वर्ष अध्यक्ष मिळालेला नसला तरी जोवर युपीएच्या अध्यक्षा पदाची झुल अंगावर आहे तोवर सोनिया गांधींचे विरोधी पक्षातील मोठेपण टिकून आहे.पण आश्चर्याची गोष्ट अशी की सध्या ज्या भाजप विरोधी पक्षांना मोठा जनाधार आहे ते पक्ष मात्र युपीएच्या वलर्यलाही उभे रहायला तयार नाहीत

आज आम् आदमी पक्षाचे दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये सरकारे आहेत.तर ममता बॅनर्जी यांचेही पश्चिम बंगाल मध्ये सरकार आहे.समाजवादी पक्षाचे भलेही सरकार नसले तर नुकत्याच पर पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 125 जागा जिंकून आपल्या मागे मोठा जनाधार असल्याचे दाखवून दिलेले आहे.आणि या तिन्ही पक्षांचा काँग्रेसला विरोध आहे अशावेळी यूपीए चे पुनर्गठन कसे काय होऊ शकते. या देशात काँग्रेसने एकतर जनाधार हरवला आहे तर दुसरीकडे काँग्रेस मधलेच जी२३ गटाच्या नेत्यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरुद्ध बंद पुकारले आहे अशा स्थितीत काँग्रेसला जवळ करायला किंवा त्यांचं नेतृत्व मानायला विरोधी पक्षातील प्रमुख पक्ष तयार नाहीत ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांचा तर जेवढं भाजपला विरोध नसेल इतका काँग्रेसला विरोध आहे आणि म्हणूनच यूपीए आघाडीला सध्या तरी काहीही भवितव्य नाही कारण शरद पवार सोडले तर काँग्रेसच्या बाजूने कुणीही नाही त्यामुळे यूपीए चे पुनर्गठन कठीण आहे आणि जरी झाले तरी युपीएच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी ही ओसाड गावची पाटीलकी असल्याने ती कुणीही स्वीकारणार नाही .

error: Content is protected !!