ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या माजी मंत्र्याचा मंदिर घोटाळा बाहेर काढणार -मलिक

मुंबई/ सध्या रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन विरोधकांचे घोटाळे बाहेर काढणारे नवाब मलिक यांनी आता फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एका माजी मंत्र्याचा मंदिर घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले त्यामुळे तो मंत्री कोण आणि त्यांचा घोटाळा कोणता याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे
दरम्यान मलिक यांना आता कुणीही गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे त्यांना काहीही बोलुदेत आम्हाला काहीही फरक पडणार नाही असे भाजप कडून सांगण्यात आले तर दुसरीकडे भाजपचे हजी अराफत शेख यांनीही नवाब मलिक यांच्यावर मुंब्रा येथील मशिदीच्या व्यवहारात ९ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करून त्यांचे अंडरवर्ल्ड बरोबर काय संबंध आहेत ते उघड करणार असल्याचे सांगितले

error: Content is protected !!