ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक-   राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सांगली – शिराळा विधानसभा मतदार संघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह ४८ हजार समर्थक व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शिवाजीराव नाईक आपल्या सर्व कार्यकर्त्या समवेत शनिवारी २ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिराळा  येथे राष्ट्रवादीत  पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती शिराळा तालुका भाजपचे अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी दिली. येथील यशवंत ग्लुकोज कारखान्याच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

१३ आ सर्व पदाधिकारी यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये ३३४ बूथ केंद्र, ८४ शक्ती बूथ केंद्राच्या सर्व पदाधिकारी व शिराळा तालुक्यातील २७ सरपंच २१९ ग्रामपंचायत सदस्य व वाळवा तालुक्यातील १७ सरपंच व १३७ ग्रामपंचायत सदस्य यांनी ही पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत.यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक, सागर नाईक,उत्तम पाटील, पांडुरंग गायकवाड,विजय महाडिक,शरद गुरव, उपस्थित होते.

बेरजेचे राजकारण

शिराळातील अडचणीत असणाऱ्या संस्थाना उर्जितावस्था आणण्यासाठी राजकारणात दोन पावले मागे जाण्याची तयारी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दर्शवली आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रसे  पक्ष प्रवेश करणार आहेत . मात्र, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक हे प्रबळ असताना त्यात शिवाजीराव नाईक यांची भर म्हणजे एकाच म्यानात दोन तलवारी असे होईल. तरी हा विधानसभा मतदारसंघ मानसिंगराव नाईक यांच्यासाठी सुरक्षित ठेवत मंत्री जयंत पाटील यांनी बेरजेचे राजकारण सुरु केले आहे.

error: Content is protected !!