ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमुंबई

नवी मुंबईत 8 गाड्या सह वाहन चोराला अटक


नवी मुंबई/ ए पी एम सी मार्केट परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढल्याने वरिष्ठांनी या गुन्हातील आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते त्या नुसार ए पी एम सी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि त्यांचे पोलीस सहकार्य गुन्हेगाराचा शोध घेत होते हा शोध घेत असताना संतोष लिंबाजी डोंगरे(21) या तरुणाला अटक करण्यात आली त्याची चौकशी केली असता त्याने एकूण 7 गुन्ह्यांची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोटार सायकल,दोन स्कूटी दोन रिक्षा आणि दोन कार अशी 8 चोरीची वाहने जप्त केली ज्याची किंमत 8,12,778 इतकी आहे.त्याचे आणखी काही साथीदार असावेत असा पोलिसांना संशय असून पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करीत आहेत

error: Content is protected !!