ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पुराच्या संकटात अडकलेल्या प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल कडून लूट

पुराच्या संकटात अडकलेल्या प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल कडून लूट
कोल्हापूर/ पुराच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपडणार्‍या प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल वाल्यांनी चांगलीच लूट केली गोव्यातून सुटणार्‍या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून प्रती सिट 2000 ते 1200 रुपये घेतले जात होते मात्र त्यांना कोल्हापूरच्या शिरोळ टोल नाक्यावर नेवून थांबवले जात होते .कोल्हापूरच्या हायवेवर 8 फुटांपर्यंत पणी असल्याने पोलिसांनी पुणे बंगळुरू मार्गावरील वाहतूक बंद केली होती मात्र हे खाजगी ट्रॅव्हल वाल्यांना ठाऊक होते तरीही ते गोव्यापासून सावंतवाडी,वेंगुर्ला,कुडाळ,कणकवली,येथील प्रवाशांना गाडीत बसवत होते आणि आमच्या दोन गाड्या हायवेवरून पास झाल्यात असे खोटे सांगून त्यांना कोल्हापूर मार्गे मुंबईला नेण्याचा बनाव करून कोल्हापूरच्या शिरोळ टोल नाक्यावर नेवून तिथेच सोडून देत होते व पुढे पाणी आहे पोलीस सोडत नाहीत आम्ही काय करणार ? असे म्हणत हात झटकत होते. चिपळूण जवळ पुलाचा एक भाग तुटल्याने मुंबई गोवा मार्ग बंद होता तसेच ट्रेन सुधा बंद होती त्यामुळे लोक कोल्हापूर मार्गे मुंबईला जाण्याचा प्रयत्न करीत होते आणि त्याचाच फायदा घेऊन खाजगी ट्रावल वाले प्रवाशांना लुटत होते

error: Content is protected !!