ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ मुंबईत.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नात भुजबळ फॅमिलीची हजेरी

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचं आज मुंबईत लग्न छोटेखानी पद्धतीनं पार पडलं. या लग्नाला भुजबळ फॅमिलीनं हजेरी लावली होती. जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ आज मुंबई पार पडला. जयंत पाटील यांनी हा विवाह सोहळा कोरोनामुळे छोटेखानी पद्धतीनं करण्यात येत असल्याची माहिती फेसबुकवरुन दिली होती.

जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला भुजबळ कुटुंबीयांनी विशेष उपस्थिती लावली होती. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. यावेळेस भुजबळ यांनी नवविवाहित जोडप्यास शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्वल वाटचालीस सदिच्छाही दिल्या.
यावेळी भुजबळांसोबतच माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यादेखील उपस्थित होत्या.

दरम्यान, आज वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतच छोटेखानी पद्धतीनं जयंत पाटील यांच्या मुलाला विवाह सोहळा संपन्न झाला.

error: Content is protected !!