ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबई जनसत्ता बातमी दणक्याने पालिकेने केली सुधारणा–रिचर्डसन अँड कू्रर्‍डास कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन सुविधा –नायर रूग्नालयावरील कोवीड रुग्णांचा भार कमी होणार

मुंबई (किसन जाधव) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या उपाय योजना केलेल्या आहेत त्यामध्ये सुसूत्रता नसल्याने पालिकेच्या आरोग्य सेवेतील काही रुग्णालयांमध्ये अधिक भार पडत होता खास करून मुंबईत कोवीड रुग्णांसाठी जे रिचर्डसन अँड कू्रर्‍डास कोविड सेंटर उघडण्यात आले होते. त्या ठिकाणी ऑक्सिजन ची पुरेशी व्यवस्था नसल्याने गंभीर कोवीड रुग्णांना नायर रुग्णालयात पाठवावे लागत होते. त्यामुळे अगोदरच कोवीड रुग्णांनी भरलेले नायर रुग्णालय हा अतिरिक्त भार सहन करू शकत नव्हते आणि हीच बाब मुंबई जनसत्ताने पालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यातील वास्तव लक्षात घेऊन अखेर पालिकेने रिचर्डसन अँड कू्रर्‍डास कोविड सेंटर मध्ये 4 कोटी 36 लाख खर्चून ऑक्सिजन प्लांट तयार केला जाणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून स्टार इलेक्ट्रिकल कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. येथे कंत्राटदाराला ऑक्सिजन फोल्डचे चार नग,डारूया सिलेंडर मनिफॉल्डचा 1नग,वैद्यकीय ऑक्सिजन प्लांन्ट करिता पुरंत स्वयंचलित डिजिटल कंट्रोल पॅनल, परिसरात अलारं,गॅस आउटलेट युनिट,ऑक्सिजन फ्लो मीटर आदी समुग्रीचा पुरवठा करावा लागणार आहे विशेष म्हणजे या ऑक्सिजन प्लान्टसाठी 250 बीडचे करोना सेंटर किंवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साठी ऑक्सिजन पुरवण्याचा अनुभव असलेल्या कंपनीलाच हे कंत्राट देण्यात आले असून महिनाभरात ते काम पूर्ण करतील त्यामुळे एक हजार बेड ची क्षमता असलेल्या या विलिगिकरण कक्षाला आता
खर्‍या अर्थाने कोवीड सेंटरचे स्वरूप आले असून आता इथे येणार्‍या आणि ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना नायर हॉस्पिटल मध्ये पाठवावे लागणार नाही भायखळा आणि आसपासच्या परिसरातील लोकांसाठी ही एक मोठी उपलब्धि असल्याचे बोलले जात असून या विषयाकडे पालिकेचे लक्ष वेधून इथल्या विलिगिकरण कक्षासाठी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत मुंबई जनसत्ताने चांगली कामगिरी केल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी मुंबई जन्सत्तला धन्यवाद दिले आहे

error: Content is protected !!