ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मुंबई- मुंबई बँक निवडणुकीतील मजूर प्रवर्ग प्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा अटक पूर्व जमीन अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र त्याना मंगळवार पर्यंत अटक करू नये असे आदेश दिले आहेत. प्रवीण दरेकर आता अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्चं न्यायालयात जाणार आहेत.
प्रवीण दरेकर यांनी ट्रेंड युनियनच्या बनावट सदस्यत्वाचा वापर करून, मुंबई बँकेचे संचालकपद मिळवले होते. तसेच मजूर नसतानाही मजूर प्रवर्गातून मुंबई बँकेची निवडणूक लढवली होती. असा आरोप करून आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती . त्यांच्या तक्रारीवरून मुंबईच्या एम आर ए पोलीस ठाण्यात प्रवीण दरेकर यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आला होता . त्यामुळे दरेकर अडचणीत आले होते. मात्र त्यांनी या प्रकरणी त्यांनी उच्चं न्यायालयात याचिका दाखल करून, हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती . आपल्या याचिकेत त्यांनी म्हटले होते कि आपण कामगार संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याबाबतचा समरी रिपोर्ट दाखल केलेला असताना, केवळ राजकीय आकसापोटी हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले असे दरेकर यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. मात्र न्यायालायने गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता . तसेच अटकपूर्व जामिनासाठी त्यांना सत्र न्यायालयात जायला सांगितले होते. त्यानुसार दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी दरेकर यांच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले कि, आम्हाला मुंबई उच्चं न्यायालयात अपील करायचे आहे. त्यामुळे अटकेपासून दोन आठवडे संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. पण न्यायालयाने त्यांची हि मागणी आणि अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला आहे . केवळ त्यांना मंगळवार पर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता अटकपूर्व जामिनासाठी दरेकर मुंबई उच्चं न्यायालयात जाणार आहेत.

error: Content is protected !!