ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजना ?

टक्केवारीचा दुसरा अध्याय
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजना
मुंबई/ पालिका शाळेतील मुलाना निकृष्ट दर्जाचे टॅब पुरवून स्वतःचे हसे करून घेतलेल्या पालिकेने पुन्हा एकदा पालिका शाळेतील मुलाना टॅब देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी पालिका ३ कोटी खर्च करणार असून कोविड काळात अशा प्रकारची अनावश्यक कामे पालिका का काढते आहे.कदाचित यामागे कंत्राटदारांचे खिसे भरून त्यातून टक्केवारी मिळवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न तर नाही ना असा संशय मुंबईकर व्यक्त करीत आहेत त्यामुळे टॅब वाटपाचा हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
पलिके मार्फत नागरी सुविधांची जी कामे काढली जातात त्यात नेत्याची टक्केवारी असते .पण कोविड काळात कामांवर मर्यादा आली आहे .त्यामुळे टक्केवारीही कमी झाली आहे पण आता पालिकेची मुदत संपत आली असून पुढील वर्षीच्या फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक आहे त्याच्या अगोदर जितके कलेक्शन करता येईल तेवढे करायचे या हेतूने नको नको ती कामे कडून इलेक्शन फंड जमवला जात असल्याची चर्चा आहे.सध्या पालिका शाळांसाठी टेंडर मागवण्यात येत असून ते ऑन लाईन भरण्याची मुदत ११ऑगस्ट ते १सप्टेंबर अशी आहे आणि ७९,६७००० अशी त्याची इशारा रक्कम आहे अर्थात हे टेडर सताधर्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांनाच मिळणार हे वेगळ सांगायला नको

error: Content is protected !!