ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

पालिका आयुक्तांना आयकर विभागाची नोटीस

मुंबई-शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांना पुन्हा आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. यापूर्वी 10 मार्च रोजी देखील आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली होती. त्याला त्यांनी उत्तर दिले होते.यशवंत जाधव यांच्यावर करोडी रुपयांचा मनी लॉन्ड्रिग करण्याचा आरोप असून त्यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या.
एप्रिल 2018 ते मार्च 2022 पर्यंत स्थायी समितीने जे-जे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, जे ठराव पास झाले त्याची सर्व कागदपत्रे घेऊन आयकर विभागाने याआधीच चहल यांना बोलावले होते. आता पुन्हा एकदा याप्रकरणी त्यांना बोलावण्यात आले आहे. या चार वर्षामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले. त्या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय हा आयकर विभागाला आहे. चौकशी एक भाग म्हणून त्यांना पुन्हा नोटीस बजावली आहे.

error: Content is protected !!