[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
राजकीय

भिवंडी कशेळी ठाणे रस्त्यावरील खड्ड्यां विरोधात धरणे आंदोलन…

भिवंडी दि 24(प्रतिनिधी ) शहरासह भिवंडी ठाणे बायपास रस्ता ,भिवंडी कशेळी ठाणे व भिवंडी अंजुरफाटा खारबाव कामण या सर्वच बीओटी वरील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी मुळे नागरीक वाहनचालक सर्वच त्रस्त झाले आहेत.या समस्ये विरोधात विविध राजकीय पक्षांकडून आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जात असतानाच वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली कशेळी टोल नाका येथे या रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात धरणे आंदोलन केले .स्थानिक पूर्णेश्वर टेम्पो मालक चालक संघटनेच्या सहकार्यांने करण्यात आलेल्या  या आंदोलनात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडावर हात, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कानावर हात तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे डोळ्यावर हात अशा स्वरूपाचे बॅनर झळकावीत शासनाकर्त्यांचा निषेध केला आहे .

error: Content is protected !!