ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

..तर हा जननायक कुणाला भारी पडेल ?

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात जे भाजपला करता आले नाही ते राज ठाकरे यांनी एका सभेत करून दाखवले.त्यामुळे भाजपतील स्थानिक नेते धास्तावले आहेत.कारण महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणणे इथल्या भाजप नेत्यांना शक्य नाही याची आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला चांगलीच प्रचती आली.कारण काँग्रेस राष्ट्रवादी मधून भाजपात जे उपरे आले .ते बिनकामाचे ठरले.फक्त तोंडाच्या वाफा घालवण्या पलीकडे त्यांच्या हातून काहीच घडणार नाही हे आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला कळून चुकले आहे . त्यामुळेच राज ठाकरेंना बळ दिले जात आहे.त्यांच्या मागे हिंदुत्वाची ताकत उभी केली जात आहे . पण शिवसेनेला शह देण्यासाठी राज ठाकरे यांना मोठे करणे आज ना उद्या भाजपला चांगलेच भारी पडणार आहे.कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेच भाजपला मोठे करण्याची चूक केली होती . ती चूक आज शिवसेनेला महागात पडली आहे . राज ठाकरेंच्या बाबतीत सुधा भाजपचे असेच होणार आहे.हिंदुत्वाचा टेकू घेऊन राज ठाकरे मोठे झाले कित्यांचे पाहिले टारगेट असेल भाजप! आणि भाजपने जे शिवसेनेच्या बाबतीत केले तेच उद्या राज ठाकरे भाजपच्या बाबतीत करणार याची चाहूल इथल्या भाजप मधल्या नेते यांना लागलीय त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. याच अस्वास्थ्य भावनेतून ते राजला मनापासून पाठिंबा द्यायला तयार नाहीत.

तसे पाहता राज ठाकरे यांच्या मनसे ची महाराष्ट्रात फार मोठी संघटनात्मक ताकत नाही.मुंबई,पुणे नाशिक, कल्याण डोंबिवली आणि ठाणे वगळता इतरत्र मनसेची ताकद नाही.पण राजच्या जुबानित दम आहे.भावनेच्या भरात वाहवत जाणाऱ्या लोकांसाठी राज ची ठाकरी भाषा खूपच फायदेशीर ठरू शकते असे भाजप नेत्यांना वाटत आहे आणि काही अंशी ते खरे आहे. पण जाती धर्माच्या नावावर आक्रमक भूमिका घेणारे लोक समाजातील वातावरण बिघडवण्यासाठी भलेही फायदेशीर ठरले तरी पुढे जेंव्हा त्यांचा ब्रम्हरक्षस होतो तेंव्हा सगळ्यात प्रथा त्याला ज्याने बनवलेले असते त्यालाच तो गिळण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आज भाजपकडून राज ठाकरेंना जे बळ दिले जातेय ते भलेही आज भाजपसाठी उपयोगी पडणारे असेल.आणि हिंदुत्व मनानाऱ्यांमध्ये एक असाही वर्ग आहे ज्याला खून खराब नको शांतता हवीय.आणि हा वर्ग नेहमीच राज ठाकरे यांच्या विरोधात आहे.शिवाय महाराष्ट्रातील जो भूमिपुत्र मराठी आहे तो सुरवातीपासूनच भाजपच्या विरोधात आहे आणि आता भाजपने राजला जवळ केल्याने हा वर्ग आणखी चिडलेला आहे .त्यामुळे राजला बळ देऊन भाजपचा फार मोठा फायदा होईल असे वाटत नाही.

error: Content is protected !!