ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

यामिनी जाधव यांची ताकत वाढू लागल्याने, विरोधी उमेदवार अरविंद सावंत यांना प्रचाराची रणनिती बदलावी लागणार

मुंबई- दक्षिण मुंबईत गेली दोन टर्म खासदार म्हणून अरविंद सावंत हे निवडून येत आहेत. गेल्या सव्वादीडवर्षां पूर्वी शिवसेनेत फुट पडली आणि एकनाथ शिंदे हे 50 आमदारांना सोबत घेत भाजपाला मिळाले आणि शिवसेनेचे मुख्यमंत्रीम्हणून शपथ ग्रहण करून विराजमान झाले.त्यानंतर काही महिन्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत फुट पाडून अजित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि काही आमदारांना सोबतघेऊन भाजपाला पाठींबा देत उपमुख्यमंत्री पद ग्रहण केले.
. आज दक्षिण मुंबईत लोकसभेच्या रिंगणात शिवसेना (उबाठा) आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही तुल्यबळ पक्षात लढत होत असल्याने दोन्ही बाजूच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हि लढत प्रतिष्ठेची केली आहे. त्यातच उबाठा शिवसेनेचे पक्के वैरी असलेले मनसेचे नेते आणि कार्यकर्ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या खासदार पदाच्या उमेदवार आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या सौभाग्यवती आमदार यामिनी जाधव यांच्या सोबत आल्याने दक्षिण मुंबईचे वातावरण अचानक बदलले आहे. दोन्ही बाजूच्या नेते आणि कार्यकर्त्यांतील दुभंगलेली मैत्री पुन्हा जुळू लागल्याची सुखद गळाभेट विशेषतः गिरगांव, माझगावात आणि शिवडीत पहायला मिळत आहे. आता मनसेचे नेते प्रत्यक्षात प्रचाराच्या रणनितीत सहभागी झाल्याने आपसूकच यामिनी जाधव यांची ताकत वाढू लागल्याने विरोधी उमेदवार अरविंद सावंत यांना त्यांची प्रचाराची रणनिती बदलावी लागणार हे मात्र नक्की.

    दक्षिण मुंबई लोकसभेसाठी शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवार म्हणून भायखळा विधानसभेच्या  शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची घोषणा झाली. या लोकसभा निवडणुकित मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक न लढविता भाजपाला आणि महायुतीला मदत करण्याचे ठरविल्याने मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, रिटा मकवाना,संजय नाईक, अविनाश जाधव आदी सर्व मातब्बर नेते मुंबईतील सहाच्या सहा लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना मनसेच्या मतांची रसद देण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन प्रचारात कार्यरत झाल्याचे दिसत आहे.

यामिनी जाधव लोकसभेची तयारी यशवंत जाधव हे बैठका घेऊन करीत आहेत. आपल्या संपर्कातील जुन्या नव्या सहकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे काम युद्ध पातळीवर सूरू असल्याचे माझंगाव ताडवाडी येथील आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्या कार्यालयातील जमलेल्या शिवसैनिक,मनसे सैनिक आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या गर्दी वरुन जाणवत आहे.

  • दिनेश मराठे
error: Content is protected !!