ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
Business

छोट्या विक्रेत्यांना मिळणार होलसेल बाजारपेठेचे व्यासपीठ-फ्लिपकार्ट होलसेल फॅशन श्रेणीचा १३५० शहरात विस्तार

अमरावती दि. २५ (प्रतिनिधी): गेल्या काही वर्षात ऑनलाईन खरेदीला ग्राहकांची पसंती मिळत असून येत्या काळातही ऑनलाईन खरेदीची प्रथा वाढीस लागणार आहे. आपल्या ग्राहकांना ऑनलाईन खरेदीचा आनंद देणाऱ्या फ्लिपकार्ट होलसेल ने छोट्या विक्रेत्यांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
फ्लिपकार्ट ग्रुपची डिजीटल बाजारपेठ असून आज फ्लिपकार्ट होलसेल तर्फे जनरल मर्कंडाइजचे अनावरण करण्यात आले. जवळपास १३५० शहरात या व्यासपीठ द्वारे फॅशन श्रेणीचा विस्तार करण्यात येणार आहे. ही अतिरिक्त उत्पादने छोट्या विक्रेत्यांसाठी होलसेल मार्केटप्लेसवर उपलब्ध असतील.

फ्लिपकार्ट होलसेलने घरात वापरता येतील असे चादरी, भांडी, साठवणुकीशी संबंधित डबे आणि अन्य साधने, घराशी सबंधित साहित्य, खेळणी, लगेज, खेळ आणि तंदुरुस्ती संबंधीत २४,००० उत्पादनांचा समावेश असेल. उत्पादनांची ही वर्गवारी महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश, गोवा, गुजरात, अनेक राज्यात किराणा आणि विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल.

या मंचाद्वारे देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १३५० पेक्षा अधिक शहरांमधील ८ हजार पिनकोडवर डिलिव्हरी करण्यात येणार आहे. ही उत्पादने अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, जालंधर, लुधियाना, मीरत, पानिपत, राजकोट, सुरत आणि त्रिपुरा येथील उत्तम निर्मात्यांकडून उपलब्ध होणार आहेत. आगामी 6 महिन्यांत या मंचावर व्यवहार वाढणार असून ५५ हजार उत्पादन दाखल होईल. ज्यामुळे पुरवठादार साखळी बळकट होऊन १ हजार विक्रेते या व्यासपीठाचा लाभ घेऊ शकणार आहे.

फ्लिपकार्ट होलसेल’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन म्हणाले की, “आपल्या विस्ताराची घोषणा ही विक्रेते, लहान व्यवसाय आणि किराणा क्षेत्रात समृद्धी आणण्याची वचनबद्धता सतत जपल्याची पोचपावती आहे. तंत्रज्ञानात बळकट क्षमतेला चालना देत आम्ही छोट्या व्यवसायांना प्रगत करण्याच्या दृष्टीने यशस्वी ठरलो आहोत. महत्त्वपूर्ण किंमतीत विस्तारीत उत्पादनांची निवड आता करता येईल. योग्य गुंतवणुकीच्या साह्याने आम्ही आयुष्यं सोपी करण्यासोबत छोटे व्यवसाय मालक आणि किराणा व्यापार अधिक नफा कसा कमावेल यादृष्टीने प्रयत्नशील आहोत.

error: Content is protected !!