ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाकिस्तानात 18 वर्षाच्या हिंदू मुलीला गोळ्या घातल्या

इस्लामाबाद – पाकिस्तानात हिंदुंवर कशा प्रकारे अत्याचार होतात हे सर्वांनाच ठावूक आहे . मात्र एका हिंदू मुलीचे अपहरण करता आले नाही म्हणून अपहरण कर्त्यांनी त्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या सक्कर मध्ये पूजा कुमारी नावाची एक १८ वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबासह राहत असे. दरम्यान पूजा सुंदर असल्याने तिच्यावर काही जणांची वाईट नजर होती त्यामुळे मंगळवारी तिघेजण पूजाच्या घरात घुसले आणि घरातल्यांना हत्याराचा धाक दाखवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने अपहरण कर्त्यांना जोरदार विरोध करताच अपहरण कर्त्यांनी तिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली आणि पळून गेले त्यानंतर पूजाच्या पालकांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली मात्र या घटनेमुळे चिडलेल्या हिंदुनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले तर पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे

error: Content is protected !!