ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याचे 11 फ्लॅट ई. डी . कडून जप्त- मुख्यमंत्र्यांच्या सासुरवाडीला ई डी ची धडक

मुंबई/ शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर कारवाई करणाऱ्या ई डी ने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅट जप्त करून थेट मुख्यमंत्र्यांच्या सासुरवाडीला च धडक दिली आहे
ठाणे येथील वर्तक नगर मध्ये असलेल्या नीलांबरी सोसायटी मधील पुष्पक ग्रुपचे फ्लॅट आहेत .त्यातील11 फ्लॅट हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांचे आहेत असे ई डी चे म्हणणे आहे तेच फ्लॅट काल जप्त करण्यात आले .नीलांवरी सोसायटीच्या बांधकामात मनी लाँडरीग पैसा आहे असा आरोप आहे .कारण पुष्पक बुलियन या कंपनीच्या विरोधात मार्च 2017 मध्ये ई डी कडे तक्रार दाखल झालेली होती.आणि त्याचा तपास सुरू होता या प्रकरणात नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या एंट्री ऑपरेटर मार्फत मनी लॉंडरींग करण्यात आली चतुर्वेदी यांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसा फिरवण्यात आला आणि याच पैशातून श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृह निर्माण संस्था या संस्थेला 30 कोटींचे वीणा तरण कर्ज देण्यात आले होते आणि या प्रकरणी यापूर्वी पाटणकर यांना इडिने समन्स पाठवले होते मात्र त्यांनी वकिलाच्या मार्फत आपली बाजू मांडली होती.विशेष म्हणजे ज्या निलांबरी सोसायटीतील हे 11 फ्लॅट जप्त करण्यात आले टी इमारत म्हाडाची घरे पाडून पुनर्विकास अंतर्गत बांधण्यात आली होती आता या सर्व प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे .
पुष्पक ग्रुप हा महेश पाटील आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची आहे आणि त्यांच्या नीलांबारी या प्रकल्पातील 11 फ्लॅट जे पाटणकर यांच्या मालकीचे होते ई डी ने पुष्पक ग्रुपची हीच 6कोटी 45 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे मात्र हे फ्लॅट श्रीधर पाटणकर यांच्या मालकीचे असल्याने आणि पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे बंधू असल्याने काही विरोधक आता मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत आहेत ‘

error: Content is protected !!