ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

Covhidshild लशीच्या दोन डोस मधील अंतर वाढविण्याचा सल्ला

नवी दिल्ली :कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतराबाबत महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात आला असून, कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. एनटीएजीआयनं हा सल्ला दिला असून, आता कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
सध्याच्या घडीला कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा बारा ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जातो. आता हे अंतर आणखी कमी केल्यास कोरोना लसीकरणालाही वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. एनटीएजीआयनं दिलेल्या सल्ल्याबाबत आता लवकरच अधिकृत निर्णयात बदललं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. बारा आठवड्यांवरुन आठ आठवड्यांवर दुसरा कोरोना लसीचा डोस आल्यास दोन महिन्यात कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस घेता येणं शक्य होणार आहे. एनटीएजीआय म्हणजे नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रूप ऑन इम्युनिसेशन! यालाच मराठी लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण सल्ले देणारी एक संस्था म्हणूनही ओळखलं जात. देशातील लसीकरणाबाबत ही राष्ट्रीय दर्जावरील संस्था वेळोवेळी लसीकरणाबाबत आपला अभ्यास आणि निदर्शन विचारात घेऊन सल्ले देत असते.

error: Content is protected !!