ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

औंरगाबाद मध्ये 1 मे रोजी राडा होण्याची शक्यता


मनसेच्या सभे विरुध्द वंचित सह 8 संघटना मैदानात
औरंगाबाद – मशिदीवर असलेल्या भोंग्याला विरोध करून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातले सामाजिक स्थैर्य बिघडवण्याचा प्रयत्न केला होता आणि आता औरंगाबाद सारख्या संवेदनशील शहरात 1 मे रोजी राज ठाकरे सभा घेणार आहेत .मात्र या सभेला वचीत बहुजन आघाडी सह 8 संघटनांनी विरोध केला आहे तसे पत्रच त्यांनी पोलिसांना दिले आहे.त्यामुळे ही सभा झाल्यास औरंगाबाद मध्ये मोठा राडा होण्याची शक्यता आहे
राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये सभा घेण्याचे ठरवले तेंव्हा पासूनच औरंगाबाद मध्ये वातावरण काहीसे अस्वस्थ आहे .राज ठाकरे या सभे निर्मित 29 तारखेला औरंगाबाद मध्ये दाखल होणार आहेत .या सभेची मनसे तर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत पोलिसांकडे परवानगीसाठी आवश्यक ते अर्ज केले आहेत.मात्र वंचित आघाडी ,प्रहार, ऑल इंडिया पँथर सेना,मौलाना आझाद विचार मंच तसेच राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक सेल्यानी विरोध केला आहे तसे पत्रच त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.दरम्यान राज ठाकरेच्या सभेला परवानगी दिली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिलाय तर त्यांच्यात हिम्मत असेल तर आमची सभा उधळून दाखवा असे प्रतीआव्हण केले आहे त्यामुळे 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये काय घडेल या विषय नागग्रिकांच्या मनात भीती आहे

error: Content is protected !!