ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

बांगला देश मधील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?


मुंबई/ भारतात मुस्लिम धर्मीय आणि त्यांची धार्मिक स्थळे सुरक्षित आहेत मग पाकिस्तान आणि बांग्लादेशात हिंदूंची धार्मिक स्थळे सुरक्षित का नाहीत.असा संतप्त सवाल मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी केला आहे
बांगला देश मध्ये हिंदूंच्या मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत बाबूभाई भवन जी यांनी तीव्र संताप व्यक्त केला नुकताच बंगला देशात 200 धर्मांध मुस्लिमांनी इस्कॉन चां राधाकंत मंदिरावर हल्ला करून मंदिराची तोडफोड केली आणि ही काही पहिलीच घटना नाही यापूर्वी सुधा हिंदूंच्या घरांच्या वर आणि मंदिरांवर हल्ले झाले होते.हिंदूंच्या बाबत जे पाकिस्तान मध्ये सुरू आहे तेच बांग्लादेशात सुरू आहे पण शेख हसीना सरकार जात्यांध मुस्लिमांवर कारवाई करीत नाही . त्यामुळे भारत सरकारने याबाबत शेख हसिनाला जाब विचारावा अनीथा बंगला देशातील घटनांचे इथे पडसाद उमटू शकतात कारण भारतातील अनेक राज्यांमध्ये बंगला देशी राहतात हे शेख हसिनाने ध्यानात ठेवावे असा इशारा बाबूभाई भवन जी यांनी दिला आहे तसेच पंत्रधान मोदी यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून बंगला देश सरकारला निर्वाणीचा इशारा द्यावा की यापुढे हिंदूंच्या मंदिरावर हल्ले झाले आणि बंगला देश सरकार गप्प राहिले तर बांगल देश बरोबरचे सर्व संबंध भारत तोडून टाकील असा पंतप्रधान मोदींनी इशारा द्यावा तरच बंगला देश सरकार तिथल्या कट्टरपंथी मुस्लिमांवर कारवाई करा असे बाबूभाई भवानजी यांनी सांगितले

error: Content is protected !!