ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शापूरमध्ये निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळून २० कामगार ठार

शहापूर – समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून मोठी दुर्घटना घडली. शहापूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरयेथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असताना गर्डर कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच इंजिनियरसह एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
पहाटेपर्यंत १७ जणांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर गर्डरखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. तर काही गंभीर जखमींना शहापूर उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गर्डरखाली दोन मृतदेह सापडल्याने आता मृतांचा आकडा २० वर पोहोचला आहे. एनडीआरएफचे अधिकारी सारंग कुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून सांगितल्याप्रमाणे २८ जणं इथे उपस्थित होते. त्यापैकी २० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तीन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आता रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे.

error: Content is protected !!