ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

नागपाड्यात बेकायदा टेलिफोन एक्सेंजचा पर्दाफाश


मुंबई – नागपाड्यासारख्या अत्यंत संवेदनशील भागात बनावट टेलिफोन एक्सेंजचा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे
परदेशातून येणारे येणारे फोन विनापरवानगी थेट लोकल फोनसेवेवर वळवून मोबाइल कंपन्या आणि सरकारचे आर्थिक नुकसान करणाऱ्या बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने एटीएसने छडा लावला आहे. एटीएस’च्या पथकाने नागपाडा परिसरात छापा टाकून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याने हे बेकायदा एक्स्चेंज चालविण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे पन्नासपेक्षा अधिक सिमकार्ड घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या फोन क्रमांकाची कुठेच नोंद होत नसल्याने त्याचा समाजविघातक कृत्यांसाठी वापर होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
नागपाडा परिसरात बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज चालविले जात असल्याची माहिती ‘एटीएस’च्या पथकाला मिळाली. या एक्स्चेंजबाबत माहिती काढत असताना ते चालविणारा तरुण आग्रीपाडा येथील एक झेरॉक्स सेंटरमधून रिचार्ज करीत असल्याचे समजले. पोलिसांनी झेरॉक्स सेंटर चालविणाऱ्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोहम्मद इद्रिस अन्सारी या तरुणाबाबत माहिती मिळाली. हा तरुण स्वतःच्या मोबाइल क्रमांकाबरोबर जवळपास 50 जणांचे मोबाइल रिचार्ज करीत असल्याचे त्याने सांगितले.मोबाइल रिचार्ज करीत असल्याचे त्याने सांगितले. यावरून एटीएसच्या अधिकाऱ्यांना बेकायदा एक्स्चेंज चालवले जात असल्याची खात्री पटली. या माहितीच्या आधारे पथकाने टेलिफोन प्राधिकरण, सायबरतज्ज्ञ यांना सोबत घेऊन मदनपुरा परिसरातील अजमल हाइट्स या इमारतीच्या 20व्या मजल्यावर छापा टाकला.

error: Content is protected !!