ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कोरोना गेल्याने देशभर होळीचा होळीचा उत्साह शिगेला मुंबईत धम्माल


कलरफुल रंगपंचमी
मुंबई/ करोना मुळे गेली दोन वर्ष देशातील जनतेला कोणताही सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता आला नाही मात्र यंदा करोना गेल्याने देशभर मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली .मुंबईमध्ये तर होळी आणि रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोचला होता त्यामुळे यंदा खऱ्या अर्थाने मुंबईत कलरफुल रंगपंचमी साजरी करण्यात आली .
शासनाने यावेळी होळी बाबत काही नियमावली केली होती त्यात रात्री दहाच्या आत होळी पेटवणे दारू पिऊन नाच गणे न करणे मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर न लावणे यासारखे नियम केले होते . यात रात्री दहाच्या आता होळी पेटविण्याचा नियम काही प्रमाणात पाळण्यात आला .पण दारू,लाऊड स्पीकर याबाबतचे नियम धाब्यावर बसवण्यात आले आणि मुंबईत अनेक ठिकाणी रात्रं भर ध्वनी क्षेपक सुरू होते .राहता राहिला सवाल दारूचा तर दारूच्या नियमात महाराष्ट्रा इतकी शिथिलता देशभर कुठे नसेल त्यामुळे दारूची दुकाने रात्री उशिरा पर्यंत सुरू होती आणि या दुकानांच्या समोर पिनाऱ्यानी तोबा गर्दी केली होती.बाठी सुरू होते त्यामुळे रात्रीपासूनच होळीचा झिंग झिंग सुरू होता त्यानंतर काल सकाळपासून रंगपंचमीच्या रंग उधळण सुरू झाली रंगात रंगलेली बच्चे कंपनी बेधडक गाड्यावर फुगे मारीत होतील . मुंबईतील अनेक सोसायट्या मध्ये काल रेन डान्स चे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी पाण्याचे टँकर मागवण्यात आले होते. तरुण तरुणींच्या सोबत काही वृध्द मंडळी सुधा रेन डान्स मध्ये सामील झाली होते.हे निवडणुकीचे वर्ष असल्याने काही राजकीय पक्षांनी होळीचे कार्यक्रम स्पॉन्सर केले होते अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर काही ठिकाणी हास्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण मुंबई काल होळीच्या रंगात रंगून गेली होती त्यात चित्रपट आणि टिव्ही मालिकांमध्ये कलाकारही मागे नव्हते सध्या टिव्हीवर सुरू असलेल्या मोठ्या मालिका आणि रियालिटी शो मधील कलाकारांनी खास रंगपंचमी निर्मित कार्यक्रम आयोजित केले होते आणि हे सर्व कलाकार रंगात रंगून रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत होते ऐकूनच काय तर कगेनाच्या .दोन वर्षांनी काल प्रथमच मुंबईत धमाल होळी कलरफुल रंगपंचमी चां मनसोक्त आनंद मुंबईकरांनी लुटला

error: Content is protected !!