ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंना भाजपच्या मैत्रीची दारे कायमची बंद – फडणवीस

मुंबई – उद्धव ठाकरे यांनी आता सोबत येण्याची दारं बंद केली आहेत, आमची मन दुखावली आहेत. ज्या प्रकारे पंतप्रधान मोदींवर बोलतात, खालच्या पातळीवर बोलतात. मनं दुखावली आहेत. जिथे मन दुखावतात तिथे युती होणे शक्य नाही. पॉलिटिकली डीफरन्स असतील तर युती होऊ शकते पण येथे पण आमची दुखावली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणत्या स्थितीमध्ये युती होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते लोकमतच्या एका कार्यक्रमात बोलत होते
मतदाराला काही किंमत आहे की नाही? आपल्याकडे अनेक नेते येत आहेत, असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याचं श्रेय नरेंद्र मोदी यांच्या कामांना द्यावं आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला द्यावं. हीच स्थिती राहुल गांधी, शरद पवार यांची आहे. उद्धव ठाकरे हे तर आतां सगळीकडे जातंय आणि आमच्या नावाने शिमगा करताय. आगे आगे देखो होता है क्या… बरेच चांगला लोक आहेत जे इच्छुक आहेत आमच्यासोबत यायला… वेवलेन्थ जुळली तर त्यांना सोबत घेऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जर लोक आमच्या सोबत जय श्री रामचा नारा देत असेल तर आम्ही का सोबत घेऊ नये, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले
राज ठाकरे मनसेसोबत येतील की नाही हे तुम्हला लवकरच कळेल, आमचे ते चांगले मित्र आहेत. ते आमच्यावर टीकासुद्धा करतात पण ते सोबत येतील का? हे लवकरच कळेल. उद्धव ठाकरे यांनी आता सोबत येण्याची दार बंद केली आहेत, आमची मनं दुखावली आहेत. ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलतात, खालच्या पातळीवर बोलतात. त्यामुळे मनं दुखावली आहेत. जिथे मनं दुखावतात तिथे युती होणे शक्य नाही. पॉलिटिकली डीफरन्स असतील तर युती होऊ शकते पण येथे पण आमची मनं दुखावली आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

error: Content is protected !!