ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार- आरपार ची लढाई सुरू


मुंबई/ किरीट सोमय्या यांनी महा विकास आघाडीतील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढायला सर्वात केल्यानंतर महा विकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष आक्रमक झाले असून त्यांनी आता फडणवीस सरकारच्या काळात भाजपा नेत्यांनी केलेल्या सर्व घोटाळ्यांच्या फायली ओपन करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी आरपार ची लढाई सुरू झाली आहे
किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात जाण्यासाठी रोखल्यानंतर काल ते कराड मध्ये आले आणि तिथेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले तसेच यापुढे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार बाहेर काढणार असून अलिबाग नजीकच्या कोरली गावात रश्मी ठाकरे यांनी घेतलेल्या जमिनीच्या गैरव्यवहाराला वाचा फोडणारअसल्याचे सांगितले तसेच हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले सोमय्या यांच्या या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडीचे नेतेही सक्रिय झाले .आणि त्यांनी काल दोन बैठका घेतल्या यापैकी एक बैठक महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची होती या बैठकीत तिन्ही पक्षांचे नेते आक्रमक झाले होते आणि जशास तसे उत्तर देण्याची मागणी करीत होते त्यानुसार आता आघाडीची तीच रणनीती असणार आहे आणि फडणवीस सरकारच्या काळात जेवढे घोटाळे झाले त्याच्या सर्व फायली पुन्हा ओपन केल्या जाणार आहेत त्यानंतर दुसरी बैठक झाली या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे उप मुख्यमंत्री अजितदादा पोलीस महासंचालक,मुंबईचे पोलीस आयुक्त आदी हजार होते रविवारी पोलिसांनी सोमय्या यांना त्यांच्या घरातच रोखून ठेवले होते त्यावेळी समोस्यावर ‘बजावण्यात आलेल्या नोटीसिवर चर्चा झाली आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काय करता येईल याबाबतच्या उपाय योजनांवर चर्चा झाली मात्र आता सोमयाचा विरोधात तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असल्याने राडा होण्याची शक्यता आहे

बॉक्स/महाराष्ट्रातले वातावरण तणावपूर्ण
सोमय्या यांनी केलेले आरोप आणि त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष यामुळे महाराष्ट्रात तणावाचे वातावरण असून सोमय्या यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे अशावेळी भाजपा आणि महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा .होण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!