ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामनोरंजनमुंबई

झेंडेची शौर्यगाथा ऐकण्यासाठी स्वतः दिदींनी झेंडेना आमंत्रित

लता मंगेशकरांचे मुळगांव गोवा . त्यामुळे गोव्यावर त्यांचे विशेष प्रेम . गोव्यातील महत्व पुर्ण घटनांकडे त्यां चे बारकाईने लक्ष असे .इन्स्पेकटर मधुकर झेंडे यांनी गोव्यात जाऊन शोभराज कसे पकडले ? हे त्यांच्याच तोंडून ऐकण्याची त्यांना भारी उत्सुकता होती .दीदी राहातात त्या प्रभूकुंज इमारती समोरील जाहीरात फलकावर अमुल कंपनीने अटकेपार झेंडे असे लिहून शोभराज अटक नाटयाचा जाहीरातीत खुबीने वापर केला होता .
दीदी घरातून रोज ती जाहीरात पाहात होत्या .एक दिवस त्यांनी नाटककार मोहन वाघ यांना फोन करुन झेंडेना पुढील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यास सांगीतले .
दिनानाथ मंगेशकरांचा ४४ वा स्मृतीदिनी समारंभ दिनानाथ सभागृहात आयोजित करण्यात आला होता . नाटककार वसंत कानेटकर , संपादक माधव गडकरी , स्वतः लतादिदी , आशा भोसले , हृदयनाथ अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली .
लतादिदींनी शाल श्रीफळ व समईची भेट देऊन झेंडेचा सत्कार केला .दिदींच्या आग्रहास्तव झेंडेंनी गोव्यातील शोभराज अटक नाटयाची कहाणी सांगीतली .दिदी ते एकाग्रतेने ऐकत होत्या .
लोक दिदींचे गाणे ऐकण्यासाठी किती आतुर असतात ? पण आज झेंडेची शौर्यगाथा ऐकण्यासाठी स्वतः दिदींनी झेंडेना आमंत्रित केले होते .
सत्काराला उत्तर देतांना झेंडे म्हणाले लतादिदींनी माझा सन्मान केला हे माझे भाग्य समजतो . या पुढेही त्यांच्या हातून माझा सन्मान होणार असेल तर असे शंभर शोभराज मी पकडून आणीन .घनःश्याम भडेकर


error: Content is protected !!