ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

आरक्षण बाबत केंद्राकडून फसवणूक


मुंबई/ केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी राज्यांचे आरक्षण बाबतचे अधिकार काढून घेतले होते आणि आता १२७ वी घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसी ची यादी निश्चित करण्याचे अधिकार बहाल केले आहेत पण जोवर ५० टक्क्यांची अत आहे तोवर काहीच होणार नाही.केंद्र सरकार राज्यांची फसवणूक करीत आहे असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सरकारसाठी चिंतेचा विषय बनलेला असतानाच केंद्राने चालू अधिवेशनात १२७ वी घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसी आरक्षण बाबत काही अधिकार दिले पण आरक्षणातील ५० टक्क्यांची मर्यादा कायम आहे ती हटवण्याची विरोधकांची मागणी सरकार मान्य करीत नाही त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटणे कठीण आहे असे पवारांचे म्हणणे आहे

error: Content is protected !!