ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

सेनेतील अंतर्गत वाद वाढला -रामदास कदम यांचे परिवहन मंत्री परब यांच्यावर गंभीर आरोप


मुंबई/ वादग्रस्त ऑडिओ क्लिप मुले सध्या सेना नेतृत्व पासून दुरावलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की माझ्या मुलाचे तिकीट अनिल परब यांनी कापलेे. सेनेच्या विरोधकांना घेऊन ते मातोश्रीवर जातात त्यांनी सेनेचे मतदार संघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा डाव रचला आहेे. ते गद्दार आहेत ..मात्र मी मरेपर्यंत शिवसेनेत राहणार पण माझ्या मुलांचे काही सांगू शकत नाही असे म्हणत त्यांनी आपली मुले दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचे संकेत दिलेे. तसेच अनिल परब हे वैभव खेडेकर आणि संजय कदम यांचे महात्मा गांधी आहेत असाही आरोप केला त्यांच्या या आरोपमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे

error: Content is protected !!