भाजपच्या होकरस युनिट मार्फत दादरच्या किंग जॉर्ज विद्यालयात मोफत फिजिओथेरपी शिबिर संपन्न
भाजपा आमदार कालिदास कोळंबकर,बाबूभाई भवणजी,नगरसेविका नेहाल शहा,जिल्हाध्यक्ष राजेश शिवलकर उपस्थित –
मुंबई/ मुंबईतील तान तणावाचे जीवन आणि लॉक डाऊन मुळे घरात राहावे लागल्याने मुंबईकरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता घरात बसून राहिल्याने शरीरातील अवयव आकडून गेले होते .ज्याप्रमाणे एखादी गाडी बरेच दिवस एका जागी परक करून ठेवल्यावर तिचे पार्ट जसे जाम होतात तशाच प्रकारे सव्वा वर्षाच्या लॉक डाऊन च्या नोकरदार माणूस घरी बसून राहिल्याने त्याच्या शरीराच्या अवयवांवर परिणाम झाला होता. त्यातून त्याला वेगवेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागत होते मुंबईकरांची हीच अडचण भाजपच्या होकर्स युनितचे अध्यक्ष आणि माजी उपमहापौर बाबूभाई भवांजी यांनी ओळखली आणि त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीतील राजा शिवाजी विद्यालयात मोफत फिजिओ थेरपी शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात आरोग्य विशेष तज्ञांच्या एका पथकाद्वारे १५० लोकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले यावेळी भाजपा आमदार कालिदास कोळंबकर,नगरसेविका नेहाल शहा,जिल्हाध्यक्ष राजेश शिवलकर आदी मान्यवर उपस्थित होते या वेळी बाबूभाई भवणजी यांनी सांगितले की यापुढे सुधा अशा शिबिरांचे आम्ही आयोजन करणार आहोत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरीश सिंग व सुनील सिंग यांनी विशेष योगदान दिले.
