ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

तरुणाईला शेअर बाजाराचे ज्ञान मिळण्यासाठी प्रशिक्षणाची गरज

.: एन एम आय टी डी ने दिला शेर बाजार चा नारा – शेअर बाजार २०२२”
शेअर बाजार हा विषय कायमस्वरूपी सगळ्यांच्याच चर्चेचा विषय आहे. शेअर बाजारात झालेली चढ आणि घसरण हा त्यातला कळीचा मुद्दा. एक चांगला गुंतवणूकदार नेहमीच बाजारातील परिस्थितीचा फायदा घेतो आणि नफा कमावतो. पण सर्वांनाच ते जमत नाही. तसेच गेल्या काही काळापासून तरुणाईचा ओघ या क्षेत्राकडे वाढतो आहे. त्यामुळे त्यांना शेअर बाजाराचे प्रशिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. याच अनुषंगाने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या “नवीनचंद्र मेहता इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी अँड डेव्हलोपमेंट” यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथे तीन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन “शेअर बाजार २०२२ ”या स्पर्धेचे आयोजन केले गेले. हि स्पर्धा दिनांक ७ मार्च ते ९ मार्च २०२२ रोजी संपन्न झाली.
युवकांना स्टॉक एक्सचेंज मधील ऑनलाईन ट्रेडिंग चा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी विद्यार्थ्याना शेअर बाजारमधील व्यवहारांची जाण व्हावी हा या स्पर्धेचा मूळ हेतू आहे. मुंबईमध्ये लाईव्ह ट्रेडींग प्रकारात होणारी हि एकमेव स्पर्धा आहे. युवकांना स्टॉक एक्सचेंज मधील ऑनलाईन ट्रेडिंग चा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी विद्यार्थ्याना शेअर बाजारमधील व्यवहारांची जाण व्हावी हा या स्पर्धेचा मूळ हेतू आहे. मुंबईमध्ये लाईव्ह ट्रेडींग प्रकारात होणाऱ्या या एकमेव स्पर्धेचा लोकमत माध्यम प्रायोजक आहे. युवकांनी कॅपिटल मार्केटमध्ये कमीतकमी वेळेत अधिकाधिक नफा कसा कमवावा याचे मार्गदर्शन तज्ज्ञाकडून केले . विद्यार्थाना २ जणांच्या टीम मध्ये भाग घेतला. युवकांनी स्वतःच्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये ट्रेड लाईव्ह मार्केट मध्ये ट्रेड करून नफा कमावला. या कार्यक्रमात १५४ युवकांनी मुंबई, नवी मुंबई, पुणे, देवगड येथून भाग घेतला होता. बक्षीस वितरण समारंभास बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आय पी एफ चे डेप्युटी उपमहाव्यवस्थापक श्री रवींद्र पलांडे यांनी विद्यार्थ्यांना शेर गुंतवणुकी व त्यातील धोके याचे उत्तम बद्धल मागदर्शन केले. हे गेली एकरा वर्ष या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहे. तसेच Angel One सह प्रायोजक आहेत. डहाणूकर कॉलेज, विवा कॉलेज, रुपारेल कॉलेज , मेनन कॉलेज व एन एम आय टी डी कॉलेज मधील विध्यार्थी यांनी रोख रुपीस तीस हजाराची बक्षीस मिळवले. या समारंभासाठी कीर्ती मविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी वि पवार , उप प्राचार्य तस्सेच डेक्कन एडुकशन सोसायटी च्या आजीव सभासद डॉ मीनल म्हापुस्कर व एन एम आय टी डी चे संचालक , डॉ खामकर आणि सह संचालक डॉ मल्ल्या उपस्थित होते.

error: Content is protected !!