ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

सरकार असो की विरोधी पक्ष या लोकांना जनतेच्या प्रति त्यांची असलेली जबाबदारी कधी कळणार?


भारतीय लोकशाहीत आता सर्वसामान्य माणसाला फारशी किंमत राहिलेली नाही कारण राजकारण आणि राजकीय पक्ष याचे पूर्णपणे व्यावसायिकरण झालेले आहे त्यामुळे सामान्य माणूस केवळ निवडणुकीत मतदान करण्या पुरताच उरला आहे.लोकांच्या प्रश्नांची कुणाला काहीही पडलेली नाही आता हेच बघान राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला आहे त्यावर चर्चा करायची सोडून विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून म्यावं म्याव करतोय आता काय म्हणावे या लोकांना? सरकार असो की विरोधी पक्ष या लोकांना जनतेच्या प्रति त्यांची असलेली जबाबदारी कधी कळणार? आणि म्हणूनच लोकांना आता पूर्णपणे लोकांना समर्मित असलेल्या लोकांच्या पक्षाची गरज आहे जो जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे पाहणारा असाव

मुंबई महानगर पालिका नव्हे तर राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत जेवढं भ्रष्टाचार झालाय तितकाच भ्रष्टाचार भाजपची सत्ता असलेल्या पुणे ,पिंपरी चिंचवड,आणि नाशिक महापालिकेत झाला आहे.भ्रष्टाचारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुधा मागे नाही मग याच लोकांना पुन्हा सते वर आणून जनतेचा पैसा लुटायचा परवाना द्यायचा का? मुंबई महानगर पालिकेत शेवटच्या दिवशी 6हजार कोटींचे 300 हून अधिक प्रस्ताव मंजूर होणे हा भ्रष्टाचाराचा जिवंत पुरावा आहे आणि याची शिक्षा त्यांना येत्या महापालिका निवडणुकीत त्यांना मिळणार आहे.हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही कदाचित सेनेलाही त्याचा अंदाज आला असावा म्हणूनच जाताजाता त्यांनी मोठा हात मारला.भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत तर अँटी करपशन वाल्यांना रंगेहाथ लाचखोर सापडले या अशा लोकांपेक्षा चंबळ चे दरोडेखोर परवडले जे एखाद्या ठिकाणी एकदाच दरोडा घालतात पण हे लोक तर निवडून गेल्यापासून पाच वर्ष लुटमार करीत असतात खाताना एकत्र खायचे आणि मग बिनसले की मीडिया समोर येऊन तू किती खाल्ले मी किती खाल्ले असे म्हणत एकमेकांची इज्जत काढायची अशा लुटारुंच्या हाती आपण आपले भविष्य सोपवायची का? या अशा व्हाईट कॉलर लुटारू लोकांमुळेच देशात नक्षलवादी तयार झालेत.ज्यांना मेहनत मजदूरी करून शेतात किंवा कारखान्यात घाम गाळून त्यांचा हक्क मिळाला नाही आणि ज्यांचे राजकीय पुढाऱ्यांनी जमीनदारांनी आर्थिक आणि सामाजिक शोषण केले अशा लोकांमुळेच या देशात विद्रोही तयार झालेत अर्थात त्यांच्या खून खरण्याचे समर्थन कुणीही करू शकणार नाही ज्यांनी कायदा हातात घेतला ज्यांनी दुसऱ्याचा जीव घेतला त्यांना शिक्षा व्हायलाच हवी पण ज्या लोकांमुळे त्यांच्यावर ही वेळ आली तेही उजळ माथ्याने फिरता नयेत त्यांनाही शिक्षा व्हायला हवी पण ती कायद्याने! आणि त्यासाठीच जनतेच्या पक्षाची गरज आहे. जन आंदोलनातून उभ्या राहिलेल्या पक्षाची गरज आहे

error: Content is protected !!