ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसात पालिका तोडणार

मुंबई – राणे आणि शिवसेनेतील संघर्ष आता हातघाईवर आला आहे पालिकेने राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसात तुम्ही तोडा अन्यथा आम्ही तोडू अशी राणेंना नोटीस बजावली आहे.
नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झालेले असल्याने पालिकेने त्यांना नोटीस बजावली होती . त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंगल्यात जाऊन बंगल्याची पाहणी केली होती . मात्र आमच्या बंगल्यात कोणतेही अनधिकृत बांधकाम झालेले नाही. आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊनच आम्ही बंगल्याचे बांधकाम केलेले आहे असे नारायण राणे आणि नितेश राणे यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा पालिकेकडून नारायण राणे याना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे कि तुमच्या बंगल्यात जे अनधिकृत बांधकाम झालेले आहे ते तुम्ही १५ दिवसात पाडा अन्यथा पालिकेला ते पडावे लागेल . पालिकेच्या या नोटिशीनंतर आता नारायण राणे पुढे काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे मात्र या निर्णायक नोटिसीमुळे राणे आणि शिवसेना यांच्यात आता नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!