ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

फक्त जय महाराष्ट्र बोलून महाराष्ट्र बदलणार नाही-बाबूभाई भवानजी

मुंबई/ महाराष्ट्रावर सध्या ५लाख कोटींचे कर्ज आहे ते कुणी घेतले,कशासाठी घेतले त्यातून किती प्रकल्प उभे ,राहिले त्यात किती तरुणांना रोजगार मिळाला याबाबतचे सत्य शोधून काडण्या ऐवजी शेजारच्या गुजरात राज्याच्या प्रगती बाबत आकाश बाळगणे चुकीचे आहे .केवळ जय महाराष्ट्र बोलून महाराष्ट्राचा विकास होणार नाही किंवा महाराष्ट्र बदलणार नाही तर बदल घडवण्यासाठी व्यापार उद्योग क्षेत्राला चालना द्यायला हवी नव्या उद्योगांना शक्य तितक्या लवकर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात तरच महाराष्ट्र बदलेल असे भाजपा नेते बाबूभाई भवlनजी यांनी म्हटले आहे
बाबूभाई यांनी याबाबतचे एक उदाहरण देताना सांगितले की पुण्यातील एका मराठी उद्योजकाने इलेक्ट्रिकल परत बनवण्याचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला.या प्रकल्पासाठी १८ कोटींची गुंतवणूक आवश्यक होती त्याच्याकडे पाच सह कोटी होते बाकीचे बँकेकडून कर्ज घ्यायचे होते.प्रकल्पासाठी चाकणला जागा शोधली जागेचा दर प्रति एकर २ कोटी होता त्यातील ५० टक्के ब्लॅक व ५० टक्के व्हाइट मनी त्यानंतर विविध परवांग्यासाठी ग्राम सेवकपासून आमदार ,खासदार पर्यंत सगळ्यांना भेटाव लागल.प्रकरण जसे जसे पुढे जात होते तास तसा प्रत्येकाचा शेअर रेट वादात होता यात दीड वर्ष गेले म्हणजे हातात थोडेफार भांडवल असतानाही महाराष्ट्रात उद्योग सुरू करणे किती अवघड आहे हे दीड वर्ष धक्के खाणाऱ्या त्या मराठी व्यावसायिकाला कळले पाच सात लाख खर्च करूनही त्याची फाईल पुढे सरकली नाही शेवटी त्याने G. I .D C Achya veb साईटवर माहिती टाकली त्यानंतर दुसऱ्या दिवशीच तिकडून फोन आला.त्यांनी प्रकल्पाची सगळी माहिती घेतली. रो मटेरियल, कस्टमर कोण हे ? सगळ जाणून घेतल आणि तीन तासात फोन करतो असे सांगितले. खरोखरच त्याने फोन करून आम्ही तुमच्यासाठी दोन तीन जागा पहिल्या आहेत. तुम्ही ‘well Come”असे सांगितले इतकेच नव्हे तर कोणत्या गाडीने येणार याची चौकशी करून मला न्यायला गाडी पाठवली त्यानंतर एका दिवसात तीन जागा दाखवल्या.त्या तिन्ही जागांवर आवश्यक त्या सर्व मूलभूत सोयी सुविधा होत्या त्यानंतर जी .आय. डी .सी च्या माध्यमातून कर्ज मिळवून दिले.५० दिवसात फॅक्टरी सुरू झाली महाराष्ट्रात सहा लाख खर्चूनही ज्याला दीड वर्षात प्रकल्प सुरू करता आला नाही .त्याने गुजरात मध्ये ५० दिवसात प्रकल्प सुरू केला हा आहे गुजरात आणि महाराष्ट्र प्रशासनातील फरक त्यामुळे अंबाणीनिने गुजरात मध्ये एक लाख कोटींची गुंतवणूक केल्या बद्दल बोटे मोडून त्यांना दोष देण्या पेक्षा महाराष्ट्रात उद्योगधंदे जलदगतीने कसे सुरू होतील त्यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणते बदल करायला हवेत यावर विचार केला तरच महाराष्ट्र बदलू शकतो असे बाबूभाई भवंlNजी यांनी म्हटले आहे.फक्त जय महाराष्ट्र बोलून महाराष्ट्र बदलणार नाही/ बाबूभाई भवानजी

error: Content is protected !!