ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे महाराष्ट्र पेटला

पुणे/ कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली होती त्याचा राग महाविकास आघाडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर काढला आणि काल पुण्यात अमित शहा यांच्या विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीने उग्र आंदोलन करीत चले जाव चले जाओ अमित शहा चले जाओ अशा घोषणा दिल्या्या्या्य.
काल पुतळा विटंबनेचा विरोधात मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसने उग्र आंदोलन केले मुंबईत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली लालबागच्या भारतमाता सिनेमा जवळ शिवसैनिकांनी आंदोलन करीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा दिल्या तर पुण्यात शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण आणि पायभरणीसाठी आलेल्या अमित शहाणा काँग्रेस राष्ट्रवादीच्या रोषाला सामोरे जावे लागले .कारण अमित शहा यांच्या स्वागतासाठी भाजपने जी बॅनर बाजी केली होती त्यावर शिवाजी महाराज किंवा बाबासाहेबांचा फोटो नव्हता तर भाजप नेत्यांचे फोटो होते त्यामुळे काल पुण्याच्या राणी लक्ष्मीबाई चौकात राष्ट्रवादी ने आंदोलन करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय अमित माफी मागा अमित शाह चले जाओ अशा घोषणा दिल्या तर काँग्रेसने सोशल मीडियावर अमित शहा जवाब दो अशी हाश टेग करून मोहीम सुरू केली आहे त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच चिघळणार आहे.

error: Content is protected !!